Wednesday, September 2, 2009

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 02

१) गोमुखी प्लॉटस : जर ईशान्य कोपरा व आग्नेय कोपरा ९० अंश पेक्षा कमी असेल व वायव्य व नैऋत्य कोपरा ९० अंश पेक्षा जास्त असेल तर असा प्लॉट गोमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ गोमुखी समजला जातो. कारण याचा परिणाम अशुभ असतो पैसा भरमसाठ मिळतो पण खर्चही तसाच होतो बचत होत नाही.

तसेच जर फक्त ईशान्य कोपरा वाढ असेल तर असाही प्लॉट गोमुखी समजला जातो. याचा परिणाम शुभ असतो पैसा चांगल्या मार्गाने मिळत जातो. पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होईल.

२) व्याघ्रमुखी प्लॉटस : जर ईशान्य कोपरा व आग्नेय कोपरा ९० अंश पेक्षा जास्त असतील व वायव्य व नैऋत्य कोपरा ९० अंश पेक्षा कमी असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो.

वायव्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व ईशान्य कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तर तसेच नैऋत्य व आग्नेय हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा वायव्य कोपरा वाढ असल्यामुळे पैशाचा अपव्यय होतो, शत्रुत्व वाढते, हातून पापकर्मे घडतात अशा प्रकारचे अशुभ परिणाम होतात.

नैऋत्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व आग्नेय कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तसेच वायव्य व ईशान्य हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा नैऋत्य कोपरा वाढ असल्यामुळे हातून पापकर्मे घडतात, कष्ट करूनही पैसा टिकत नाही. तसेच आत्मघाती प्रसंग येतात, अपघात, आत्महत्या अशा प्रकारचे अशुभ परिणाम दर्शविते.