मयमतम (अ ७), मत्स्यपुराण (अ २५३), समरंगाव सूत्रधार (अ १२) , अपराजितपृक्छा (अ ५६) इत्यादि ग्रन्थ संदर्भा नुसार वास्तुपुरुष्याच्या अंगावर स्थानापन्न आसलेल्या देवता पुढिलप्रमाणे आहेत :-
वास्तुपुरुष्याच्या डोक्याच्यावर म्हणजे शीर्ष या स्थानी शिखी ही देवता आहे, मुखावर आप ही देवता, छातीवर अपवस्त ही देवता येते । डाव्या स्तनावर पृथ्विधर ही देवता व उजव्या स्तनावर अर्यमा ही देवता येते । त्याच्या डाव्या नेत्रावर दिति व उजव्या नेत्रावर पर्जन्य ही देवता आहे, डाव्या कानावर आदिती व उजव्या कानावर जयंत ही देवता आहे, डाव्या खांद्यावर ऋषी (सर्प) व उजव्या खांद्यावर इन्द्र ही देवता आहे, डाव्या भुजेवर सोम (चंद्र), भल्लाट, मुख्य, नाग या देवता व उजव्या भुजेवर सूर्य, सत्य, भृष, अंतरिक्ष या देवता । डावा कोपर व गुडगा यावर रोग ही देवता येते । डावी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळ्वे यावर रुद्र व रुद्रजय येतात । उजवा कोपर व गुडगा यावर अनिल ही देवता येते । उजवी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळवे यावर सवित्र, सविता या देवता येतात । डावीकडील जांघेवर पापयक्ष्मा, शोष, असुर, वरुण, पुष्पदंत, सुग्रीव, दैवारिक या देवता आहेत । उजवीकडील जांघेवर पूषा, वितथ, ब्रृहत्क्षत, यम, गन्धर्व, भृंगराज, मृग या देवता आहेत । लिंगावर इन्द्र व इन्द्रजय या देवता आहेत । दोन्ही पायावर पितृ ही देवता आहे । पोट मित्र व विवस्वान यावर आहे । हृदयावर ब्रम्हा ही देवता आहे । मित्र व विवस्वान यावर पोट, जांघ आणि मंड्या यांचा भाग येतो तसेच आर्यामा व पृथ्वीधर या स्थानी हातांच्या तळव्यानजीकचा भाग येतो ।