Thursday, September 3, 2009

वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 03

यल (L) आकाराचे प्लॉट्स : आपण प्लॉट खरेदी करताना तो कसा पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण काही प्लॉट्स (L) यल आकाराचे असतात. असे प्लॉट आपली वास्तू बांधण्यासाठी अयोग्य असतात. असे यल आकाराचे प्लॉट आपल्याला त्याचा कोणता कोपरा कट आहे त्या प्रमाणे अशुभ फळे देतात. यल (L) आकाराच्या प्लॉट मध्ये कोणता कोपरा कट असल्यावर त्याचे अशुभ परिणाम कोणते मिळतात ते आपण पुढील प्रमाणे पाहूया.

(अ) ईशान्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट :
अनेक प्रकारच्या संकटाना तोंड द्यावे लागते, संतती मध्ये पुरुष संतती कमी व स्त्री संतती जास्त तसेच वास्तू मालकास मानसिक स्वास्थ्य मिळत नाही, आर्थिक संकटे येतात, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.
 

(ब) आग्नेय कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : आशा प्रकारच्या प्लॉट चे परिणाम जास्त करून वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या स्त्रियांना होतात, आर्थिक संकटे येतात, मानसिक स्वास्थ्य बिघडते तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.
 

(क) नैऋत्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट :
अपघात, आर्थिक संकटे, मानसिक स्वास्थ्य, आजारपण आशा प्रकारच्या परिणामांना तोंड द्यावे लागते.
 

(ड) वायव्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : पैशाचा अकारण खर्च वाढतो, पैसा येतो तसा खर्चही होतो. मुलींच्या लग्न कार्यात अडथळे, शत्रुत्व निर्माण करतो, तसेच चोरीचे भय वाढते.