Friday, September 25, 2009
घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार
Monday, September 14, 2009
धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश
उदाहरण : घराची रुंदी १५ हाथ लांबी २५ हाथ आहे. यांना गुणल्यावर म्हणजे लांबी x रुंदी = आकारमान ३७५ हाथ मिळते. यातून त्या घराचे धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश मिळतात.
धन = (३७५ x ८) / १२ = ० अर्थात १२ धन (बाकी शून्य राहते त्यामुळे)
ऋण = (३७५ x ३) / ८ = बाकी ५
आय = (३७५ x ९) / ८ = बाकी ७
नक्षत्र = (३७५ x ८) / २७ = बाकी ३ (एकूण २७ नक्षत्रे त्यातील ३ रे नक्षत्र )
वार = (३७५ x ९) / ७ = बाकी १
अंश = (३७५ x ६) / ९ = ० अर्थात ९ (बाकी शून्य राहते त्यामुळे)
ऋण - धन पेक्षा ऋण अधिक असेल तर ते घर अशुभ समजले जाते.
Tuesday, September 8, 2009
वास्तुपुरुष एकाशितीपद मंडळातील ब्रह्म, दैव, मनुष्य व पिशाच्च भाग
Sunday, September 6, 2009
अष्टदिशा
१. पूर्व दिशा : या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे. त्याची पत्नी शची देवी आहे. त्याचे नगर (पूर) अमरावती आहे. त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (१) , वृषभ (२) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.
२. आग्नेय दिशा : या दिशेचा दिशापालक अग्नी देव आहे. त्याची पत्नी स्वाहा देवी आहे. त्याचे नगर (पूर) तेजोवती आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. त्याचे आयुध भोप (रोज) / राग (क्रोध) हे आहे. या दिशेची राशी मिथुन (3) आहे. या दिशेचा रंग लाल/तांबडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धान्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे.
४. नैऋत्य दिशा : या दिशेचा दिशापालक नैऋती देव आहे. त्याची पत्नी दीर्घा देवी आहे. त्याचे नगर (पूर) कृष्णांग आहे. त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे. त्याचे आयुध कुंत हे आहे. या दिशेची राशी कन्या (६) आहे. या दिशेचा रंग धूम्र आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धैर्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचे ग्रह राहू-केतू हे आहेत.
Friday, September 4, 2009
भूमीचा आकार व उतार
जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 02
जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 01
Thursday, September 3, 2009
वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 03
(अ) ईशान्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : अनेक प्रकारच्या संकटाना तोंड द्यावे लागते, संतती मध्ये पुरुष संतती कमी व स्त्री संतती जास्त तसेच वास्तू मालकास मानसिक स्वास्थ्य मिळत नाही, आर्थिक संकटे येतात, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.
(ब) आग्नेय कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : आशा प्रकारच्या प्लॉट चे परिणाम जास्त करून वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या स्त्रियांना होतात, आर्थिक संकटे येतात, मानसिक स्वास्थ्य बिघडते तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा उत्पन्न होते.
(क) नैऋत्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : अपघात, आर्थिक संकटे, मानसिक स्वास्थ्य, आजारपण आशा प्रकारच्या परिणामांना तोंड द्यावे लागते.
(ड) वायव्य कोपरा कट असलेला (L) आकाराचा प्लॉट : पैशाचा अकारण खर्च वाढतो, पैसा येतो तसा खर्चही होतो. मुलींच्या लग्न कार्यात अडथळे, शत्रुत्व निर्माण करतो, तसेच चोरीचे भय वाढते.
Wednesday, September 2, 2009
वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 02
तसेच जर फक्त ईशान्य कोपरा वाढ असेल तर असाही प्लॉट गोमुखी समजला जातो. याचा परिणाम शुभ असतो पैसा चांगल्या मार्गाने मिळत जातो. पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होईल.

वायव्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व ईशान्य कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तर तसेच नैऋत्य व आग्नेय हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा वायव्य कोपरा वाढ असल्यामुळे पैशाचा अपव्यय होतो, शत्रुत्व वाढते, हातून पापकर्मे घडतात अशा प्रकारचे अशुभ परिणाम होतात.
नैऋत्य कोपरा ९० अंशा पेक्षा कमी असेल व आग्नेय कोपरा ९० अंशा पेक्षा जास्त असेल, तसेच वायव्य व ईशान्य हे दोन्ही कोपरे बरोबर ९० अंश असतील तर असा प्लॉट व्याघ्रमुखी प्लॉट मध्ये येतो. पण हा अशुभ समजला जातो. कारण वस्तूचा नैऋत्य कोपरा वाढ असल्यामुळे हातून पापकर्मे घडतात, कष्ट करूनही पैसा टिकत नाही. तसेच आत्मघाती प्रसंग येतात, अपघात, आत्महत्या अशा प्रकारचे अशुभ परिणाम दर्शविते.

Monday, August 31, 2009
वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीचा आकार - 01
१) वास्तुशास्त्र प्रमाणे जमिनीचा आकार चौकोनी, आयताकृती असावा.
२) जागा त्रिकोणी, गोलाकार, वेडीवाकडी असू नये.
३) जागा पंचकोनी, षटकोनी, वेडीवाकडी असू नये।

४) जर जागा वेडीवाकडी असेल तर ती चौकोनी, आयताकृती करून घ्यावी व मगच त्यावर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करावे.
५) जागेचा ईशान्य कोपरा वाढ असेल तर ती जागा वास्तुशास्त्राप्रमाणे चांगली.
६) जागेचा ईशान्य कोपरा सोडून इतर कोणताही कोपरा वाढ चांगला न्हवे. परंतु तो चौकोनी करून वापरता येतो. अधिक माहिती पुढील आकृतीवरून स्पष्ट होईल.

वस्तूच्या दिशा व पंचतत्वे
पुढील आकृतीवरून हि संकल्पना अधिक स्पष्ट होईल :

वास्तुपुरुष आणि त्याची मर्मस्थाने
समरांगण सूत्रधार याच्या आध्याय क्रमांक १२, १३ मध्ये पुढील माहिती दिली आहे :
वास्तुपुरुषाच्या डोक्यात, मुखात, हृदयात, बेंबीत (नाभीत) तसेच वास्तुपुरुषाच्या दोन्ही स्तनावर जे बिंदू दर्शिवले आहेत त्यांना वास्तुपुरुषाचे षण्महान्ति बिंदू म्हणतात, वंश रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्या ठिकाणावरील बिंदुना महामार्मास्थान म्हणतात. तसेच उभ्या व आडव्या रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्या ठिकाणावरील बिंदुना उपमर्म स्थान असे म्हणतात.
या मर्म स्थानावर जर कोणतेही बांधकाम, खांब, खिडकी, दार, भिंत आली तर वास्तुपुरुषाच्या ज्या ज्या बिंदुना बाधा होईल त्या त्या ठिकाणी वास्तुमालकास तसेच त्या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या वाक्तीस पिडा होते. म्हणून वस्तू बंध्तन या मर्म स्थानावर कोणतेही बांधकाम येणार नाही याची काळजी घ्यावी. थोडक्यात, वास्तू बांधण्याचा प्लान करताना या मर्मस्थानांचा खूप गाम्भिर्याने विचार करावा.
पुढील आकृतीवरून आपल्याला अधिकच स्पष्ट होईल :

Friday, August 28, 2009
वास्तु एकाशितिपद मंडल
वस्तुशास्त्रत कोणते कार्य कोणत्या देवतेच्या पदावर करावे याबद्दल खुप सुक्ष्म विचार केला गेला आहे । तय प्रमाने जर वास्तु निर्माण झाले तर सुख, ऐश्वर्य, कल्याण, संपत्ति, संतति, आयुष्य याची प्राप्ति होते ।
वस्तुपदमंडलाच्या बाहेर ईशान्य कोनापासुन अनुक्रमे चरकी, स्कन्द, विदारी, अर्यमा (विकट), पूतना, जम्भं, पाप्रराक्षसी (पाप) व पिलिपिच्छ हे बालग्रह येतात यांना मुख्या दिशा यांचे रक्षण करणारे दिक्पाल आशी संज्ञा दिली आहे । त्या त्या प्रमाने त्या त्या दिशेवर त्यांचे प्रभुत्व आसते ।
पूर्व दिशेवर इन्द्र, आग्नेयावर अग्नि, दक्षिण वर यम्, नैऋत्य वर नैऋत्ती, पच्छिम दिशेवर वरुण, वायव्य दिशेवर वायु, उत्तरेवर सोम-कूबेर व ईशान्य वर इशान हे दिकपाल आहेत ।

वास्तुपुरुषाच्या अंगावरील ४५ देवता
वास्तुपुरुष्याच्या डोक्याच्यावर म्हणजे शीर्ष या स्थानी शिखी ही देवता आहे, मुखावर आप ही देवता, छातीवर अपवस्त ही देवता येते । डाव्या स्तनावर पृथ्विधर ही देवता व उजव्या स्तनावर अर्यमा ही देवता येते । त्याच्या डाव्या नेत्रावर दिति व उजव्या नेत्रावर पर्जन्य ही देवता आहे, डाव्या कानावर आदिती व उजव्या कानावर जयंत ही देवता आहे, डाव्या खांद्यावर ऋषी (सर्प) व उजव्या खांद्यावर इन्द्र ही देवता आहे, डाव्या भुजेवर सोम (चंद्र), भल्लाट, मुख्य, नाग या देवता व उजव्या भुजेवर सूर्य, सत्य, भृष, अंतरिक्ष या देवता । डावा कोपर व गुडगा यावर रोग ही देवता येते । डावी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळ्वे यावर रुद्र व रुद्रजय येतात । उजवा कोपर व गुडगा यावर अनिल ही देवता येते । उजवी मांडी, प्रकोष्ट व हातचे तळवे यावर सवित्र, सविता या देवता येतात । डावीकडील जांघेवर पापयक्ष्मा, शोष, असुर, वरुण, पुष्पदंत, सुग्रीव, दैवारिक या देवता आहेत । उजवीकडील जांघेवर पूषा, वितथ, ब्रृहत्क्षत, यम, गन्धर्व, भृंगराज, मृग या देवता आहेत । लिंगावर इन्द्र व इन्द्रजय या देवता आहेत । दोन्ही पायावर पितृ ही देवता आहे । पोट मित्र व विवस्वान यावर आहे । हृदयावर ब्रम्हा ही देवता आहे । मित्र व विवस्वान यावर पोट, जांघ आणि मंड्या यांचा भाग येतो तसेच आर्यामा व पृथ्वीधर या स्थानी हातांच्या तळव्यानजीकचा भाग येतो ।

Tuesday, August 25, 2009
वास्तुशास्त्राची ओळख
तसा हा विषय आपनास नविन वाटतो पण विषय तसा नवीन नाही; कारण मनुष्य तेवडा विचार करत नाही, त्याच्याकड़े तेवडा वेळ नाही आहे, पण मित्रहो आपण या विषयावर गांभिर्याने विचार केला पाहिजे यावर तुमचा प्रश्न असेल तो म्हणजे का बरे ? मित्रहो तुमचे म्हनने तुमचा प्रश्न बरोबर आहे म्हनुनच आपण या विषयावर येथे माहिती बघणार आहोत,
प्रथम आपणाला या वास्तुशास्त्राची ओळख करुन घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्र म्हणजे नेमक काय असा विचार डोक्यात येतो। मित्रहो, वास्तु याचा अर्थ आहे - निवास करने, वास्तुशास्त्र हे निवास कसा करावा याचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र हे वस्तु पासून बनले आहे पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश या सर्वांचा उपयोग कशाप्रकारे करावा याचे ज्ञान वास्तुशास्त्र करुन देते ।
संक्षिप्तपने बघण्याचे झाले तर वास्तुशास्त्र हे असे ज्ञान आहे जे आपणास घर, बंगला, दुकान, फैक्ट्री यांची रचना कशी करवी की त्यामुळे मनुष्यास स्थैर्य, सुख, शांती, समाधान, यश, धन, ऐश्वर्य मिळावे तसेच त्याला सर्व क्षेत्रात शुभता प्राप्त कीर्ति ।मनुष्य हा यश कीर्ति हे मिळवन्यासाठी प्रयत्न करत असतो पण हे करताना त्याला दुःख, रोग, अशांति विघ्न यानाही तोंड द्यावे लगते हे सर्व करत असताना आपणास या अड़चनी का येतात याचा आपण विचार करतो पण आपणास त्याचे उत्तर मिळत नाही या सर्वाचा विचार आपण येथे करुया त्यासाठी आपण थोड़ी या शास्त्राची अधिक माहिती या ठिकाणी बघूया ।
वास्तुशास्त्र कथा
वास्तुशास्त्रच्या वास्तुपुरुषाच्या तश्या दोन- तिन कथा आहेत त्यातील एक कथा आपण येथे पाहणार आहोत, त्यातील एक - फार प्राचीन काळी अंधकासुर नावाचा महापराक्रमी राक्षस होता । पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव-राक्षस वैर्य मग काय आपल्या परक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अन्धकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शंभु महदेवांकड़े धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासुराला युद्धाचे आवहान केले त्याने आवहान स्वीकारले । श्री शिवशंकर आणि अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला । अंधकासुर मरण पावला । या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या, त्यातील एका घामाच्या थेंबातुन एका करालपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष ।
या करालपुरुषाने तेथेच मरूण पडलेल्या अन्धकासुराच्या प्रेताचा प्रथामतः फडशा पाडला पण त्याची भूख कही केल्या भागेना मग त्याने भगवन श्री शिवशंकरांची आराधना केलि आणि त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील काहीही खावुन टाकन्याची अनुमति मागितली वर मागताच वर देने आशी ख्याति भोलेनाथ श्री शिवशंकर यांची त्यानी त्याला तथास्तु म्हणुन वर दीला । वर मिळाल्यावर त्याने जे कही दीसेल ते खावुन टाकन्यास सुरुवात केली त्याने मन्दिर, डोंगर, घर, वृक्ष, प्रसाद, प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला, त्यामुळे तीन्ही लोकांत हाहाःकार उडाला देव, दानव, मानव सर्वच घाबरले । या करालपुरुषाला कसे आवरयचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता (त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातुन झालेला।) त्याला युद्धात पराजीत करनहि कठिन होते । आता काय करावे सर्वच मोठया पेचात पडले ।
देव-दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले । दोघांनी मिळुन एक युक्ति शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करुन गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबुन धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहिल याची दक्षता घेतली ।
वस्तुपुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रतेक देव-दानव यांनी तो उठू नये म्हणुन त्याला सगळीकडून प्रतेकी एकाने धरून ठेवले । ईशान्य ही दिशा शिवशंकर यांची आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आर्शीवाद घेण्यासाठी तेथे थांबने या गोष्टी ओघाने आल्याच । देव-दानव यांनी श्री शिवशंकर यांची करुना भाकाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केलि । पण त्याल्या शिवशंकर यांनी काहीही काहीही खावुन टाकण्याचा वर दिला होता । मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली । सरतेशेवटी एक तोडगा निघाला । या तोडग्यानुसार पृथ्विवरिल सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणुन खावे तसेच नविन घर बांदल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे । आशा घराचे रक्षण वस्तुपुरुषाने करावे असे ठरले ।
तसेच यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बलि (नैवेज्ञ) हाही तुझाच आहार राहिल तसेच जे वास्तुपुजा करनार नाहीत तेहि तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहिल । आशा प्रकारे त्याला वचन दिले गेले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला । तेव्हापासून वास्तुशांति करण्याची प्रथा प्रचलित झाली । कोणतीही नविन वास्तु बंधल्यावर किंवा वस्तुत कोताही बदल (जीर्णोद्धार) केल्यानंतर वास्तुशांति करणे अनिवार्य आहे । नाहीतर ती वास्तु वस्तुपुरुशाचा आहार बनेल व तेथे स्मशान होइल असा उल्लेख मत्स्यपुराण अध्याय-२५३ मध्ये ओवी नम्बर १७, १८, १९ मध्ये उल्लेखले आहे।
वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणुन त्याला देव-दानव यांनी सगळीकडून चारही बाजूने तसेच त्याच्या अंगावर चढूण धरून ठेवले होते त्याच्या त्या शरीराचा तो तो प्रतेक भाग त्यावर स्थान्पत्र झालेल्या देवतेच्या नावाने ओळखला जावू लागला । सर्व देवतांचा यावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला। त्याला पकडून धरलेल्या एकूण ४५ देवता आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापत्र आहेत त्याची आकृति पुढे आहे । वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर रेखांकित केलेल्या ४५ देवतांच्या या रेखाचित्रास वास्तुपदमंडल असे म्हणतात । याचा उपयोग मनुष्यास राहण्ययोग्य निवास बांधताना होतो । कारण यातील प्रतेक देवतेचे वेगळे एक तत्त्व आहे । त्या तत्वानुसार प्रतेक स्थानाची फलश्रुति प्राप्त होते । बांधकाम करतांन जर यात कही दोष राहिले तर त्या त्या देवतेच्या तत्वाची हनी होते व त्याचा त्रास वास्तु मालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारी व्यक्तिस होतो । म्हणुन वास्तु-निवासचे बांधकाम करताना याची काळजी घ्यावी लागते ।